Share

हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंनी लगावला मोदींना टोला

Published On: 

रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं.

दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला.

मागील वर्षी सुद्धा निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर ठीक वर्षभरानंतरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!