Share

Uddhav Thackeray | “सगळ्यांना वाटत होतं शिवसेनेचं काय होणार? पण …”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Published On: 

मुंबई : एकानाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. शिंदे गटातील नेते सतत ठाकरे गटातील नेत्यांवर आरोप करत असतात. सध्या दसऱ्या मेळाव्यावरूनही शिंदे आणि ठाकरे गटामध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला निशाणा साधला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

शिवसेना एकच आहे. कोण कुठे काय करतंय माहीत नाही. असे दसरा मेळावे होतच असतात. इतरांचेही होत असतात. पण शिवसेनेचा मेळावा एकच, शिवाजी पार्कवर, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

सगळ्यांना वाटत होतं की आता शिवसेनेचं काय होणार? पण शिवसेनेचं काय होणार याचं उत्तर मिळण्याआधीच शिवसेना दहा पावलं पुढे गेली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, अनेकजण रोज भेटायला येत आहेत. ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधीही आले होते. त्यांचाही मेळावा होणार आहे. रोज कुणीतरी मातोश्रीवर येऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगत आहे.

तसेच, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत हे सांगावं लागतं हे त्यांचं दुर्दैवं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना चांगलंच फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!