मुंबई: शिवसेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. त्यातच शिंदे गट शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा सांगणार असल्याची माहिती समोर येत होती. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत संवाद साधला. कायद्यानुसार शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, असा विश्वास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं.
पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटले कि, “आता काही जण बोलत आहेत सन्मानाने बोलवलं तर मातोश्रीवर जाऊ. या लोकांना मातोश्रीवर प्रेम आहे याबद्दल त्यांचे आभार मानतो, धन्य झालो. मात्र जेव्हा आमच्यावर- ठाकरे कुटुंबियांवर-मातोश्रीवर टीका करत होते तेव्हा याच लोकांची दातखिळ बसली होती. आता टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हीच लोकं बसले आहेत तेव्हा हे प्रेम खरे की खोटे? शिवसेनेने एवढी पदे दिल्यावर असे का वागले हा प्रश्न आहे.
दरम्यान एखादा आमदार पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपतो का? सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही. तसेच अनेक फोटो येत आहेत की एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले पण असं नाहीये. कारण सध्या महापालिका अस्तित्वात नाही. त्यामुळं म्हटलं तर हे त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असतील, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : भाजपला माझ्यावर बोलण्यासाठी ४० नवीन भोंगे मिळाले – संजय राऊत
- Uddhav Thackeray : “सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
- Sanjay Raut : ‘महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्यासाठी भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव’; संजय राऊतांचा आरोप
- Uddhav Thackeray : धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही वेगळा करू शकत नाही – उद्धव ठाकरे
- Deepali Sayed : ठाकरे-शिंदेंना एकत्र करण्यासाठी नरेंद्र मोदींनी मध्यस्ती करावी- दिपाली सय्यद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

