Jayant Patil। मुंबई : राज्यात महिन्याभरापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यापूर्वी दोन्ही बाजूने 27 जुलैपर्यंत प्रतित्रापत्र, कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. यानंतर आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूचक विधान केल्याने जयंत पाटलांनी पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले. तसेच अरुणाचल प्रदेश सरकारसारखा निकाल महाराष्ट्राच्या बाबतीत ही लागू शकतो, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच पुढे युक्तिवाद करताना त्यांना कोर्टाचा दृष्टिकोन लक्षात आला, त्यावर त्यांचा युक्तिवाद जो तयार केला होता त्यापेक्षा वेगळा युक्तिवाद करण्याची गरज भासली, त्यामुळे त्यांनी वेळ मागितला असावा. त्यामुळे कोर्टाने दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रं सादर करायला सांगितली आहेत, असा अंदाज त्यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, मला अपेक्षा आहे, आठ दिवसानंतर प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर निर्णय तर होईलच, मात्र मला अभिमान आहे की हा जो सरकार पाडण्याचा अनागोंदी प्रकार झाला आहे, त्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे, त्यात कोर्ट तातडीने तारखा देत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. यानंतर आता १ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- S Sreesanth : “विराटच्या टीममध्ये असतो तर भारत…”, भारताचा माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
- Devendra Fadnavis | सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “आमची केस…”
- Sanjay Raut। खासदार कोणत्या मजबुरीतून सोडून गेले हे आम्हाला माहिती आहे, यामध्ये राजकारण अजिबात नाही : संजय राऊत
- Eknath shinde vs shiv sena : पक्ष सोडला नाही तर पक्षांतरबंदी कायदा कसा लागू होणार?; हरीश साळवेंचा सवाल
- Ravi Rana : “आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला”, संजय पांडेंच्या अटकेनंतर रवी राणांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

