🕒 1 min read
Harish Salve। मुंबई : आज उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात (सर्वोच्च न्यायालय) दाखल केलेल्या काही याचिकांवर सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणी पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. तसेच हे प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तसेच वकील हरीश साळवे यांनी आज एक महत्वाचा युक्तिवाद केला.
एखाद्या राजकीय पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जातात तेव्हाच ती फूट मानली जाते. मात्र शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोक अजूनही शिवसेनेतच आहेत. दुसऱ्या पक्षात विलीन झालेले नाहीत. तसेच पक्षातल्या एका मोठ्या गटाला पक्षाचं नेतृत्व बदलावं वाटलं तर त्यात चूक काय आहे, असा सवाल सुप्रीम कोर्टात विचारण्यात आला आहे, असा जोरदार युक्तिवाद वकील अॅड. हरीश साळवे यांनी केला. मात्र यानंतर आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, सरन्यायाधीश रमण्णा यांनी आपण हायकोर्टात का गेला नाहीत असा प्रश्न शिंदे गटाला केला आहे. यावर हरिश साळवे यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावल्याने त्यांना तात्काळ रोखणं गरजेचं असल्यामुळे सुप्रीम कोर्टात दाद मागितल्याचे म्हटले. तर काही याचिकांमधील मागण्या अर्थहीन असून संबंधित कागदपत्रं सादर करण्यासाठी पुढील आठवड्यापर्यंत वेळ द्यावा, अशी मागणी हरिश साळवे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “रावसाहेब दानवे पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर…”,‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- Deepali Sayed : “अजुनही वेळ गेलेली नाही, उद्धव साहेब आणि शिंदे साहेबांनी…”; कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य
- IND vs WI : टीम इंडियाची वेस्ट इंडीजमध्ये एन्ट्री, कोच राहुल द्रविड यांचा दिसला खास लूक; पाहा VIDEO!
- Aditya Thackeray : घोटाळे, लफडी करायची तुम्ही आणि हे लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा; आदित्य ठाकरे आक्रमक
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता, पुढील सुनावणी १ ऑगस्टला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
