मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey ) यांना त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांबाबत ईडीने अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणी आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत “आम्हाला खऱ्या अर्थाने ईडीच्या माध्यमातून न्याय मिळाला”, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी हनुमान चालीसा प्रकरणी आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत म्हटले कि, “नवनीत राणा आणि मला दोन दिवस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. लॉकअपमध्ये आम्हाला पाणी दिलं नाही, बसायला चटई दिली नाही. आमच्या घरात पोलीस घुसवून आम्हाला अटक केली. यामुळे संजय पांडेंचा पापाचा घडा भरला होता. आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे”,
दरम्यान ईडीने ‘एनएसई’च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासह संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. संजय पांडे यांची दिल्ली ‘ईडी’ने दोन दिवस चौकशी करत मंगळवारी अटक केली. संजय पांडे यांच्या आयसेक सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत २००६ साली त्यांनी आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले होते. या कंपनीला २०१० ते २०१५ या दरम्यान एनएसई सव्र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरिक्षण करण्याचे कंत्राट दिले होते. पण त्या काळात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप ठेवण्यात आला. तसेच ‘एनएसई’ कर्मचाऱ्यांचे फोनटॅपिंग केल्याचा आरोपही संजय पांडे यांच्यावर आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Sayed : “अजुनही वेळ गेलेली नाही, उद्धव साहेब आणि शिंदे साहेबांनी…”; कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य
- IND vs WI : टीम इंडियाची वेस्ट इंडीजमध्ये एन्ट्री, कोच राहुल द्रविड यांचा दिसला खास लूक; पाहा VIDEO!
- Aditya Thackeray : घोटाळे, लफडी करायची तुम्ही आणि हे लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा; आदित्य ठाकरे आक्रमक
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता, पुढील सुनावणी १ ऑगस्टला
- IND vs WI : वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघाला करावा लागणार ‘या’ संकटांचा सामना; वाचा सविस्तर…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

