🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मिळून एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांची बंडाळी मोडून काढण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत. अशातच आता महाविकास आघाडीच सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याच्या चर्चांना उधाण आलंय. २१ जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
त्याबरोबरच भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे. या संदर्भात शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचा दावा खोटा असल्याचे सांगत या निव्वळ भूलथापा असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेकडून करण्यात आलं आहे.
त्याबरोबरच “उद्धव ठाकरे जे बोलायचं ते खुलेआम बोलतात त्यामुळे कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये” असं शिवसेनेकडून सांगण्यात आल आहे. वृत्तवाहिन्यांकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्यापासून थांबवलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, शिवसेना आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. या लढाईत सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. १२ जुलै पर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने शिंदे गटाला दिलासा मिळालाय.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
