मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा आज (28 जून, मंगळवार) आठवा दिवस आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गेल्या सात दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. अशा स्थितीत 22 जून ते 24 जून दरम्यान ठाकरे सरकारने कोट्यवधी रुपयांचे अध्यादेश आणि प्रस्ताव ( Government Resolution-GR ) काढले. या सर्व पाश्वर्भूमीवर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळत आहे. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद संजय शिरसाठ यांच्या सभेबाबत गंभीर आरोप केला आहे.
संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून अंबादास दानवेंनी आरोप केला आहे. दानवे म्हणाले, “पत्रात मतदारसंघात विरोधकांना निधी देण्यात आला, म्हणून आमचा जीव कासावीस होतो असं म्हटलं आहे. या मतदारसंघात कोण विरोधक आहे? दोन्ही मतदारसंघात विरोधक नाही. मग असं का लिहिलं जात आहे? माझ्याकडे जाहिराती आहेत. माझ्याकडे संजय शिरसाठ यांचं फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामवरील सर्व रेकॉर्ड आहे. यांनी स्वतः बरंच काही लिहिलं होतं,” असे अंबादास दानवे म्हणाले.
सामना अग्रलेखातून बंडखोर आमदारांवर टीका –
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून टीका केली आहे. मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –


