Share

Uddhav Thackeray : भाजपसोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. बंडखोर आमदारांच म्हणणं आहे कि, शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजप सोबत जावं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, आमदारांचा माझ्यावर दबाव आहे कि आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. असे कोण आमदार आहेत घेऊन या माझ्याकडे. बघू आपण मला पटलं आणि सगळ्या सैनिकांची इच्छा असेल तर चला भाजप सोबत. पण जो भाजप आपल्याशी विश्वास घातकीपणाने वागला आहे. २०१४ साली युती तोडली. २०१९ ला आपल्या विरोधात बंडखोर उभे केले. आपल्याला दिलेली वचनं त्यांनी नाकारली. त्याच भाजपसोबत जायचं असेल तर एक गोष्ट पाहिजे. भाजपकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे. ते सर्व शिवसैनिकांना मान्य पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील 5 मोठे मुददे पुढील प्रमाणे आहेत. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई 12 जुलैपर्यंत टळली. उपाध्यक्षांच्या सूचनेला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारांना 12 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ, सुनील प्रभू आणि अजय चौधरी, तसंच केंद्राला सुप्रीम कोर्टाची नोटीस, म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षणं करावे. पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. तसेच ११ जुलैपर्यंत बहुमत चाचणी घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!