Ramdas kadam । मुंबई : काल माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे. तर आज त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील सल्ला दिला. यानंतर रामदास कदमांच्या भुमीकेवर अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
उठ..सूठ जो तो आता पक्षप्रमुखांना सल्ला देतोय. बंडखोरांना सल्ला देण्याचा अधिकार कोणी दिला? अडचणीच्या काळात सर्वजण आपले स्वार्थ साधत आहेत. राजकीय पुनर्वसन व्हावे म्हणून यांना विधानपरिषदेवर पाठविले. मात्र, त्यांनीच आता पक्षप्रमुख यांचा छळ सुरु केल्याचे अरविंद सावंत म्हणाले आहेत. सध्या जे सुरु आहे ते सबंध महाराष्ट्र हे उघड्या डोळ्याने पाहत आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी साधी चर्चा देखील केली नाही आणि पक्षाबद्दल कसली आलीय अस्वस्थता. हे सर्व उद्धव ठाकरे यांना झुकवायला निघालेले आहेत. पण औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती कधी झुकले नाहीत, असेही अरविंद सावंत यांनी ठणकावले आहे.
दरम्यान, पक्षप्रमुख हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेच संकेत त्यांनी दिले तर रामदास कदमांनी केलेल्या सर्व विधानांचा सावंतांनी समाचार घेतला आहे. शिवसेनेतील फुटीर गटाकडून पक्षावरच दावा केला जात आहे. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. न्याय प्रक्रियेवर आपला विश्वास असून यासंबंधी काय होईल याची सुनावणी ही उद्यापासूनच होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात असे झाले नाही त्यामुळे फुटीर गटाला आता भाजपाशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आता भाजपात जाणार का ? असा सवाल सावंत यांनी रामदास कदम आणि शिंदे गटाला केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena MP | अखेर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात! पहिला PHOTO आला समोर
- kirit somaiya : शिंदे साहेबांची शिवसेना आणि मोदी साहेबांचं भाजप एकत्र होऊन… – किरीट सोमय्या
- NCP vs BJP | भाजपने शिवसेना फोडली ; रामदास कदमांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे जोरदार प्रत्युउत्तर!
- Shivaji Adhalrao Patil : चुकीनं हकालपट्टी होण्याएवढा मी छोटा माणूसंय का?; शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिवसेनेला सवाल
- VIDEO | “साजना तुझ्याविणा सुणे…”; ‘केसरीया’चं मराठी व्हर्जन ऐकलं का?

