Share

जाधव परिवाराला कसं वाचवायचं यातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार व्यस्त आहेत – सोमय्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या भायखळा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधील काही माहितीवर आयकर विभागाने संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे जाधव यांची आमदारकी आता धोक्यात आली असल्याचं दिसून येत आहे. कर्ज प्रकरणातील अनियमितता या मुद्द्यावरुन आयकर विभागाने मनी लाँडरिंगचा प्रश्नही उपस्थित केला आहे.यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळी यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आयकर विभागाला तफावत आढळून आली असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने केली आहे.

कोलकाता येथे असणाऱ्या शेल कंपनी आणि आमदार जाधव यांचे पती त्यांच्या नातेवाईकांना अवैधरित्या पैसा पुरवत असल्याचं ही आयकर विभागाला आढळून आलं आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने नियमाप्रमाणे प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्यास सांगितल्यानंतर आयकर विभागाच्या पाहणीत या बाबी समोर आल्या आहेत. शेल कंपनी असलेल्या प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 1 कोटी रुपये घेतल्याचं आढळून आलं. ही कंपनी एंट्री ऑपरेटरच्या माध्यमातून चालवली जाते, असेही आयकर विभागाच्या तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव यांचे हवाला किंग उदय शंकर महावार, बिमल अगरवाल….. सोबत किती कोटीचे व्यवहार झाले आहेत? किती शेल कंपन्या बनवल्या? किती मनी लाँड्रींग? किती पैसे विदेशात, यूएईला ट्रान्स्फर करण्यात आले? याचा तपास इन्कमटॅक्स आणि ईडी करत आहे आणि यशवंत जाधव परिवाराला कसं वाचवायचं त्याच्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार व्यस्त आहेत असा घणाघात सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!