Share

चिंता करू नका, शासन नुकसान भरपाई देणार ; मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तांना दिलासा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी कोल्हापूर येथील शिवाजी पूल येथे भेट देवून रेस्क्यू ऑपरेशन आणि पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.

यानंतर कल्याणी हॉल येथे पूरग्रस्तांच्या शिबीराला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. ते म्हणाले, तुमचे जीवन महत्वाचे आहे. तुम्ही सुखरूपणे बाहेर आलात याच जास्त समाधान आहे. जे काही तुमच्या शेतीचे नुकसान झाले असेल त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याची चिंता करू नका. ती आमची जबाबदारी आहे. यानंतर त्यांनी छत्रपती शाहू विद्यालय येथील पूरग्रस्त शिबीराला भेट दिली.

येथील पूरग्रस्तांसाठी केलेली व्यवस्था पाहून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना घरांची तसेच शेतीची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना आरोग्याची सुविधा दिली जाईल, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.

या पाहणी दौऱ्यात पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मलिन्नाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

देशाला सुवर्ण दिवस स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच : अरविंद सावंत

 

पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – शरद पवार

 

‘धनंजय मुंडेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!