टीम महाराष्ट्र देशा: महापूराने बाधित झालेल्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यामुळे केवळ विमानातून घिरट्या घालून काही होणार नाही, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
कोल्हापूर व सांगली शहर पाण्यामध्ये आहे, पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना अन्न, कपडे आणि पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, पूरग्रस्त भागातील अनेक गावांमध्ये शासकीय मदत मदत पोहचली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी पक्षपातळीवर हजर रहावे, तसेच अन्न, गरम कपडे, औषधे आदी साहित्याची मदत करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले आहे.
‘या’ कारणासाठी शिवसेनेनी केले पाकडय़ांचे त्रिवार अभिनंदन
चिंता करू नका, शासन नुकसान भरपाई देणार ; मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तांना दिलासा


