🕒 1 min read
मुंबई : चिपी विमानतळाच्या उद्घाटना आधी शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. अखेर श्रेयवाद तात्पुरता बाजूला ठेऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्घाटनप्रसंगी एका मंचावर दिसणार आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे शेजारी शेजारी बसणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राणे साहेबांचं स्वप्न पूर्ण होत असताना स्वर्गीय बाळासाहेबांचा मुलगा व्यासपीठावर असणार आहे. उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे. राणे साहेब हे शिवसेनेचे सर्वात कडवे शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे, त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो, समाधान वाटत आहे की विमानतळ येत असताना बाळासाहेबांचा मुलगा व्यासपीठावर असल्यामुळे बाळासाहेबांचे आशिर्वाद राणे साहेबांना मिळाले याचं समाधान आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
नारायण राणे साहेब आज मंचावर आपलं मन मोकळ करणार आहेत. ते कोणाला आवडेल, कोणाला खुपेल हे सांगता येत नाही, मुख्यमंत्रिपदाला गालबोट लोगू नये, असा आमचा प्रयत्न असणार आहे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे की, आम्ही चिपी विमानतळासाठी काय केलंय ते लोकांना माहिती आहे.त्यामुळे आम्हाला पोस्टरबाजीची गरज नाही, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आयकर विभागाच्या छाप्यावर छत्रपती उदयनराजे म्हणाले, मला यावर…
- ठाकरे-राणे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात होणार उद्घाटन
- महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार सुरु; आर्यन खान प्रकरणी शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
