Share

नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!

Published On: 

मुंबई: आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी आणि अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी हे भाजपशी संबंधित असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी फोटोसह अधिकाऱ्यांचा भाजपशी संबंध असल्याचे दाखवले आहे. अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी मनीष मर्चंट हा एनसीबीचा अधिकारी नसून भाजपचा नेता असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. भानूशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे फोटो देखील नवाब मलिक यांनी दाखवले आहेत. आता आज पुन्हा एकदा नवाब मलिक पत्रकार परिषद घेत एनसीबीची पोलखोल करणार आहेत.

नवाब मलिक यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. ते आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.मुंबई येथील राष्ट्रवादी भवन, बॅलार्ड इस्टेट मध्ये ते एनसीबीची पोलखोल करणार आहेत.

दरम्यान एनसीबी विरोधात नवाब मलिक यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबईत फिल्म इंडस्ट्री आणि अन्य क्षेत्रातील बड्या व्यक्तींच्या मागे या यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. त्यांना भीती घालण्यासाठी खासगी लोकांना हाताशी धरले गेले आहे. फ्रॉड आणि प्रायव्हेट डीटेक्टिव्ह असलेल्या व्यक्ती यात सामील आहेत. त्यांच्या माध्यमातून बदनामी करून लोकांना घाबरवून खंडणी वसुल केली जात आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!