सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित असणार आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
केंद्रीय मंत्री आणि शिवसेना यांच्यातील वैर तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांना थेट अटक करण्यात आली होती. त्यामुळे यांच्यातील वैर अधिकच वाढलं आहे. आता आज 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. या निमित्ताने मुख्ममंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने ते एकमेकांना भेटणार का, काय बोलणार यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.
अखेर कोकणी माणसांचं स्वप्न साकार होत आहे. चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ शनिवारपासून सुरू होत असून त्याची लँडिंग चाचणी पूर्ण झाली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आज सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटन सोहळा मोजक्या हा निमंत्रितांच्या उपस्थितीत होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे राज्य, केंद्राचे मंत्री, प्रमुख अधिकारी यांच्यासाहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळी निमंत्रित असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खानला दिलासा नाहीच; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- ‘वसुलीसाठी सरसावणारे हात मदतीसाठी मागे येतात’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
