🕒 1 min read
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. या प्रकरणावर भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘मला यावर काहीही वाटत नाही मी सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे लोकांची जशी मानसिकता बधिर झाली आहे, तशीच अवस्था माझीही आहे. या धाडींबद्दल मला काही माहिती नाही. सध्या धाडी इकडे पडतात, धाडी तिकडे पडतात, पण लोकांनी यातून बोध काय घ्यायचा हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न पडला आहे. आता काय प्रत्येक ठिकाणी ही एक फॅशन झालीय’, अशी प्रतिक्रिया छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
तसेच माध्यमं लोकांपर्यंत काय पोहोचवतात यावर लोकं विचार करतात. क्रिकेटमध्ये जसं क्लीन बोल्ड असतं तस आता ही एक फॅशन झाली आहे. Give him Clean cheat, Give him Clean cheat यावर लोकं विचार करतात की क्लीनचिट म्हणजे नेमकं काय? हा नेमका शब्द तडजोडी करता आहे का असे लोकं विचार करतात. लोकप्रतिनिधींचा प्रभाव काही कार्यकर्त्यांवर होत असतो. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे. आत्ताचं सगळं चित्र पाहिल्यानंतर विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. एकदा का विश्वासाहर्ता गेली की पक्ष कोणताही असो विश्वासार्हता गमवली की काही राहतं नाही’ असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या नातेवाईक आणि कुटुंबियांवर सुरु असलेल्या छापेमारीविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते शुक्रवारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी समर्थकांनी पुण्यात आंदोलन करत अजित पवारांना समर्थन दिलं. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. अजित पवारांनी कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना शांततेचं आवाहन केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खानला दिलासा नाहीच; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- ‘वसुलीसाठी सरसावणारे हात मदतीसाठी मागे येतात’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
