🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलं आहे.
सीबीआय, ईडी, आयकर अशा सर्व केंद्रीय यंत्रणांना उभ्या देशात कोणतेही काम नाही. सर्व भ्रष्ट माणसे महाराष्ट्रातच आहेत, अशा पद्धतीने काम सुरू आहे. महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे असे प्रकार सुरू आहेत. यातून महाराष्ट्राच्या अर्थकारणावर परिणाम होत असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला.
महाविकास आघाडीतील पक्षांनी ११ ऑॅक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार आहे. शिवसेनेच्या सर्व आघाड्या, भारतीय कामगार सेना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंदला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. डावे पक्ष, सर्व संघटना, युनियन या बंदमध्ये असणार आहेत, असेही सावंत म्हणाले.
केंद्र सरकार ज्या पद्धतीने राष्ट्रीय धोरण राबवीत आहे, गोरगरीब फसवणूक आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे त्याचा परमोच्च बिंदू लखीमपूर खेरी येथील घटनेने गाठला आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलानेच गाडी घातली, हा लोकशाहीवरचा डाग आहे. शेतकऱ्यांना चिरडून टाकणारे कृषी कायदे, कामगारांना उद्ध्वस्त करणारे कामगार कायदे यासोबतच अत्यंत बेछूट पद्धतीने देशात खासगीकरण सुरू आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद पुकारण्यात येत असल्याचे सावंत म्हणाले.
दरम्यान, याबाबत नवाब मलिक हे आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीची चूक लक्षात आणून एनसीबीची पोलखोल करणार असल्याचं त्यांनी ट्वीट करत सांगितलं आहे. मलिक काय माहिती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आयकर विभागाच्या छाप्यावर छत्रपती उदयनराजे म्हणाले, मला यावर…
- ठाकरे-राणे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात होणार उद्घाटन
- ‘महागाईवर नियंत्रण आणण्याचे काम सरकारच्या हातामध्ये’: भारतीय रिझर्व्ह बँक
- ‘वसुलीसाठी सरसावणारे हात मदतीसाठी मागे येतात’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
