🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण बदललं आहे. यापुर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार राज्यात होते. परंतू आता या महाविकास आघाडीमध्ये एकप्रकारची दरी निर्माण झाली असून, ते एकत्र नसल्याचं बोललं जात आहे. अशातच याचसंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही आजही एकत्र आहोत. आमच्यात कोणत्याच प्रकारची फूट पडलेली नसल्याचंं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. काल विधानभवनामध्ये महाविकास आघडी पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती. त्यानंत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा सामना आम्ही केला आहे. त्यामुळे त्या संकटापुढे आताच संकट काहीच नाही. त्याचाही सामना करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्तासंघर्षाच्या निर्णयावर विचारले असता, न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते ती निःपक्षपातीपणे निर्णय घेण्यासाठीच. त्यामुळे न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे दोन आधारस्तंभ जोपर्यंत मजबूत आहेत तोपर्यंत देशात लोकशाहीच राहील, बेबंदशाही टिकणार नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई थोरात उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Supreme Court | शिंदे गटाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या – सुभाष देसाई
- Uddhav Thackeray। मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात हजर
- Eknath Shinde । “माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा एक-एक काढू शकतो, परंतु…” ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा!
- Shrikant Shinde । रिक्षावालाच भारी, मर्सिडीज मधून पक्ष वाढू शकत नाही; श्रीकांत शिंदेंची थेट आदित्य ठाकरेंवर टीका
- CM Eknath Shinde | मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रिटचे करणार ; एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
