Share

Video-उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा हॉस्पिटलमध्ये डान्स

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- सातारा- खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डान्स करत धुडगूस घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान,आजारी असल्याच्या नावाखाली कोठडीऐवजी शासकीय रुग्णालयात आरामात जगणाऱ्या या आरोपींचा व्हिडीओ चक्क त्यांच्याच एका अतिउत्साही कार्यकर्त्याने काढल्याचंही स्पष्ट झालं आहे.

‘सुरुचि’ बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी दोन्ही राजे गटांचे काही कार्यकर्ते अटकेत असून, त्यांच्या जामिनाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण आजारी असल्याचे दाखवत या कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आसरा घेतला आहे. दरम्यान, काही आरोपींना अंतिम जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच शासकीय रुग्णालयातील या राजकीय आरोपींची ‘तब्येत’ क्षणार्धात खडखडीत झाली. त्यांनी मोबाईलवरील गाणे ब्ल्यू टूथ स्पिकरवर घेऊन नाचण्यास सुरुवात केली.

 टी-शर्ट अन् बर्मुडा घालून जोरजोरात नाचणाऱ्या या कार्यकर्त्यांचे शूटिंग काढण्याचा मोहही यातीलच एका अतिउत्साही सहकाऱ्याला आवरता आला नाही. आपल्या मोबाइलमधून काढलेली ही क्लिप त्याने नंतर बाहेरच्या एका मित्राला व्हॉटसअ‍ॅपवरून पाठवली. मित्रालाही याचा इतका आनंद झाला की त्याने चक्क वेगवेगळ्या ग्रुपवर हा व्हिडीओ फिरवला.

त्यानंतर हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला. पोलीस खात्याच्या हातीही हा व्हिडीओ लागला आहे. या आरोपींच्या खोट्या आजाराला शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मंडळीच जबाबदार असल्याची तक्रार खुद्द पोलीस खात्याने यापूर्वी आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. तसंच न्यायालयातही याबाबतचे एक पत्र दिलं होतं. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांने कार्यकर्त्यांचा काढलेला धिंगाण्याचा व्हिडीओ न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!