Share

‘पीए’नेच काढला काटा! जाणून घ्या बच्चू कडूंना अडचणीत आणणारे गोपाल तिरमारे कोण आहेत ?

Published On: 

अमरावती : न्यायालयाने राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू(Bachhu Kadu) यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच कारावासासोबत त्यांना २५ हजारांचा दंडही भरावा लागणार आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे(Gopal Tirmare) यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

या सर्व प्रकरणानंतर गोपाल तिरमारे आहेत तरी कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या स्थापनेपासून त्यांच्या सोबत असलेले आणि तद्पश्चात त्यांचे स्वीय सहाय्यक आणि त्यांच्या विरोधात जाऊन नंतर नगरसेवक बनलेले व्यक्ती म्हणजे गोपाल तिरमारे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना तिरमारे म्हणाले होते की,‘बच्चू कडू यांच्या अनेक आंदोलनात मी कार्यकर्ता आणि स्वीय सहाय्यक म्हणून सोबत होतो. तसेच २००७ पासून मी त्यांच्या सोबत काम करत आहे.’

दरम्यान, २०१५ मध्ये नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते. यावेळी प्रहारने मनिषा नागलिया यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, वेळेवर सुनिता गणवीर यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी गोपाल तिरमारेसह तीन नगरसेवकांनी मनीषा यांनाच मतदान केले आणि नांगलिया यांचा विजयही झाला. त्यामुळे बंडखोरी प्रकरणी गोपाल तिरमारे यांच्यासह तीन नगरसेवकांवर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई सुरू झाली. त्यानंतरच बच्चू कडू आणि गोपाल तिरमारे यांच्यातील मतभेद वाढत गेले.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!