Share

२००८ साली घडलेल्या ‘त्या’ घटनेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

Published On: 

जळगाव: मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी यासाठी २००८ साली मनसेने आंदोलन केले होते. त्याचे पडसाद जळगावात उमटले होते. याप्रकरणीच २१ ऑक्टोबर २००८ रोजी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान त्यावेळी पंधरा हजारांचा जामीन मंजूर करून या खटल्यात गैरहजर राहण्याची परवानगी न्यायालयाने राज ठाकरे यांना दिली होती. आज या खटल्याचा निकाल लागला असून, जळगाव न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Innocent release of MNS president Raj Thackeray) यांच्यासह तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अॅड.प्रकाश बाविस्कर,(Adv. Prakash Baviskar) जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, ( Adv. Jamil Deshpande) पदाधिकारी रज्जाक सय्यज, ( Razzak Sayyaj) प्रेमानंद जाधव (remanand Jadhav)यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

दरम्यान २००८ साली रेल्वे भरतीसाठी झालेल्या आंदोलनानंतर(MNS agitation for recruitment of Marathi children in the railways in Mumbai in 2008) याच दिवशी जळगावात मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेत्वृत्वात अॅड.जमील देशपांडे, प्रेमानंद जाधव, रज्जाक यासीन यांनी गोलाणी मार्केट या भागात डिजीटल बॅनरवर ‘फाशी द्या लालूला आधी जोडे मारा साल्याला’ असे लिहून घोषणाबाजी केली होती. त्यावेळी पोलसांना बघून कार्यकर्त्यांनी पळ ठोकला, मात्र यामध्ये वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. याविरोधातच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्टेबल श्यामकान्त पाटील यांनी राज ठाकरेंसह इतर कार्यकर्त्यांवर २१ ऑक्टोबर २००८ साली गुन्हा नोंदवला होता.

दरम्यान या खटल्याचे कामकाज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांच्यासमोर २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाले. काल (११ फेब्रुवारी) या घटनेचा निकाल लागला असून न्यायालयासमोर आलेला पुरावा पाहता व खटल्यातील आरोपी पक्षाकडून केलेला युक्तीवाद लक्षात घेऊन न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, अॅड जमील देशंपाडे, प्रेमानंद जाधव आणि यासीन रज्जाक यांची निर्दोष मुक्तता केली.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!