🕒 1 min read
गोवा : भारतीय निवडणूक आयोगाने काहीच दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. उत्तरप्रदेश,गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निवडणूका होणार आहेत. तर या विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. पंजाब राज्य सोडले तर इतर चारही राज्यात भारतीय जनता पक्ष एकतर थेट सत्तेवर आहे किंवा सत्तेत भागीदार आहे. भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत करण्यासाठी अनेक राजकीय आघाड्या झाल्या आहेत.
गोवा राज्यात भारतीय जनता पक्षा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांनी राजकीय आघाडी केली आहे. आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गोवा राज्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात सर्वात ठळक बाब म्हणजे गोवा राज्यात सत्तेत आल्यास आम्ही मध्यम वर्गाला परवडेल अश्या किमतीत पर्यटन सुरु करणार आहोत अशी ग्वाही दिली आहे. आम्ही सत्तेत आल्यावर जलसंपदा विभागावर भर देऊन शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यास बळ देऊ. शेतकऱ्यांना जोड धंदा दिला पाहीजे. मत्स्यउद्योगास पण राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास चालना देणार असल्याचे जाहीरनाम्यात लिहले आहे.
नवाब मलिक यांनी गोवा राज्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत असतानाच गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला एकहाती बहुमत मिळणार असे पण भाकीत वर्तवले आहे, गोव्यात निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असेल असाही ठाम विश्वास वर्तविण्यास ते विसरले नाहीत.
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्रात टोळीचे सरकार – चंद्रकात पाटील
- नरेंद्र मोदींचे आश्वासन पूर्ण; शेतकऱ्याच्या खात्यात आले पंधरा लाख; मात्र…
- चंद्रकांत पाटलांच वक्तव्य चुकीचं; ‘त्या’ आरोपांवरुन अजित पवारांचा पलटवार
- अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार – अजित पवार
- IPL 2022: सुरेश रैना पुन्हा ‘या’ संघात जाणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
