नवी दिल्ली – भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर, उदयनराजेंसह भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा केली. उदयनराजेंना भाजपाकडून मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा होती. त्यानुसार, उदयनराजेंना संसदेच्या स्थायी समितीत स्थान मिळाले आहे.
याशिवाय, खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे.
दरम्यान,उदयनराजेंचा राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी सोहळा चांगलाच वादात सापडला होता. मात्र, उदयनराजेंनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन तो वाद संपुष्टात आणला. तर, दुसरीकडे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही मी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचा उपासक असल्याचे ट्विट करुन सांगितले आहे.
कोणाला कोणती कमिटी?
उदयनराजे भोसले, भाजपा- रेल्वे कमिटी,प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना- कॉमर्स कमिटी,डॉ. भगवान कराड, भाजपा- पेट्रोलियम कमिटी,ज्योतिरादित्य सिंधिया, भाजपा- एचआरडी कमिटी,रंजन गोगोई- परराष्ट्र विषयक कमिटी.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत, हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन
“नगरसेवक हरवले आहेत, आजारात सोडलत आता आम्ही मतदान करताना सोडतो!”
टिकटॉकवर बंदी; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केले सरकारच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक
उद्यापासून 31 जुलैपर्यंत OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

