Share

उद्यापासून 31 जुलैपर्यंत OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिका, सिनेमा यांच शूटिंग बंद होतं. या लॉकडाऊन काळात अनेक सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट असणारा ‘दिल बेचारा’ हा उदया 24 जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुशा्ंतबरोबर ‘संजना सांघी’ हा नवा चेहरा दिसणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन कास्टिंग डिरेक्टर ‘मुकेश छाबरा’ याने केले आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची बहुप्रतिक्षित शकुंतला देवी Amazon Prime वर 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन अनू मेनन यांनी केले आहे.

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री राधिका आपटे यांचा ‘रात अकेली है’ हा चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हनी त्रेहनचं दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमात श्वेता त्रिपाठी, इला अरुण, खालिद तैय्यबजी, शिवानी रघुवंशी आणि तिग्मांशु धूलिया देखील दिसणार आहेत. तर कुणाल खेमुचा कॉमेडी ड्रामा असणारा सिनेमा लुटकेस देखील 31 जुलै रोजी डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी असून कुणाल व्यतिरिक्त यामध्ये रसिका दुग्गल, विजय राज, रणवीर शौरी, गजराज राव असे तगडे कलाकार असणार आहेत.

तिग्मांशू धुलियाचा ‘यारा’ हा सिनेमा Zee5 वर 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विजय वर्मा, विद्युत जामवाल, अमित साध आणि केनी डी हे चार कलाकार 4 मित्रांची भूमिका निभावणार आहेत. यामध्ये शृती हसन देखील मुख्य भूमिकेत आहे.

Dil Bechara : सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!