Share

“नगरसेवक हरवले आहेत, आजारात सोडलत आता आम्ही मतदान करताना सोडतो!”

Published On: 

पुणे: पुणेरी पाट्या जगप्रसिद्ध आहेत. एखाद्याची चुक टोमण्यातून वा भाषेच्या योग्य उपयोगातून कशी लक्षात आणून द्यायची याचे स्तुत्य उदाहरण म्हणजे पुणेरी पाट्या. आता या कोरोना महामारीच्या काळात देखील अशीच एक पुण्यातील बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरत आहेत. देशभरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पुण्यातील वाढती रुग्णसंख्या हि चिंतेची बाब आहे.

तर आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाचा ताण वाढत असून दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णांवरून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला होता. आता,  त्यातच संसर्ग वाढत असताना आपल्या वार्डात निवडणुकीत निवडून दिलेले नगरसेवक फिरकतही नसल्याने पुण्यातील नागरिक संतप्त झाल्यांच पाहायला मिळत आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको – अमित देशमुख

हीच भावना ओळखून पुणे युवक काँग्रेसने पुण्यातील रामवाडी परिसरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. यावर “नगरसेवक हरवले, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडणार,” असं लिहिलं आहे.  या बॅनरबाजीतून नगरसेवकांवर खोचक टीका करण्यात आली असून, संकटसमयी कामी न येणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीतून अद्दल घडवण्याचे आवाहन देखील केले जात आहे.

मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत, हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन

तर, मोठंमोठ्या राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड स्टार्सना देखील विळखा घालणाऱ्या या कोरोना संसर्गाने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील संसर्गीत झाले होते. तर, पुण्यासह पिंपरी-चिंचवड मधील अनेक आजी-माजी आमदार, नगरसेवक, पालिका कर्मचारी यांना देखील कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. खबरदारी म्हणून अनेक नगरसेवकांनी हा मार्ग अवलंबलेला असला तरी नागरिकांची मात्र गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आनंदाची बातमी : राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!