Share

टिकटॉकवर बंदी; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केले सरकारच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे.

आनंदाची बातमी ! भारतात कोरोनाची पहिली लस तयार, मानवी चाचणीला दिली परवानगी

देशात टिकटॉकचे 20 कोटींपेक्षा जास्त युझर्स आहेत. गूगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरमधील टॉप 10 अॅप्सपैकी एक होतं. सरकारने बंदी घातलेल्या इतर अॅप्सपैकी बहुतांश अॅप अजूनही प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. लवकरच हे अॅप्स देखील प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरुन हटवले जातील. यानंतर कोणत्याही नव्या युझरला हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही.

अभिनेत्री निया शर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने टिकटॉकवरील बंदीचे स्वागत केले आहे. ‘देश वाचवल्याबद्दल आभार. टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा परवानगी देऊ नका,’ असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

जिल्हाधिकारी होम व्कारंटाइनमध्ये, पंढरपुरातील नियोजनाची जबाबदारी आता ‘या’ अधिकाऱ्यावर

अभिनेत्री रश्मी देसाईनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘गेल्या काही महिन्यांत प्रचंड ताण तणाव पाहायला मिळतोय, जो लोकांना मानसिकदृष्ट्या प्रभावित करतो आहे. आपल्या सरकारने चीनी अ‍ॅप्स बंद करण्याचा जो काही निर्णय घेतला, निश्चितपणे त्यामागे काही ठोस कारण असणाऱ,’ असे तिने म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!