Share

पंजाब निवडणूक प्रचार दौऱ्यात प्रियांका गांधींची आम आदमी पक्षावर सडकून टीका, म्हणाल्या…

Published On: 

चंदीगड : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देशातील ५ राज्यांच्या विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत. उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि पंजाब या पाच राज्यात निवडणूका होणार आहेत. तर या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. पंजाब या राज्यात काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष या दोन राजकीय पक्षांमध्येच प्रमुख स्पर्धा असणार आहे. चरणजीत सिंग चन्नी आणि नवजोत सिंग सिद्धू या दोन नेत्यांच्या वादात काँग्रेस अडकली असतानाच, आम आदमी पक्षाने पंजाब राज्याच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.

आज पंजाब मधील निवडणूकीकरता प्रचार करत असताना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज पंजाब मध्ये एका जाहीर सभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या कि, ” आम आदमी पक्षाचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झालेला आहे आणि आम आदमी पार्टी  ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, त्यामुळे आम आदमी पक्षाला मत म्हणजे भाजपलाच मत होय. पंजाब मधील ” नयी सोय और नया पंजाब” या निवडणूक रॅलीत त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या कि, ” अरविंद केजरीवाल प्रमुख असणाऱ्या आम आदमी पक्षाचा उदय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून झाला आहे. दिल्ली मध्ये आम्ही खूप काम केले आहे असं आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नेहमी म्हणत असतात, मात्र त्यांनी शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात काहीच कामगिरी केली नसल्याची टीका प्रियांका गांधी यांनी आज केली .

तसेच गेल्या काही वर्षात आमचे पंजाब मधील सरकार जरा भरकटले होते पण आता ते व्यवस्थित लाईनवर आले आहे असे म्हणत त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर पण अप्रत्यक्ष रित्या निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!