ठाणे : राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात बोलत असतांना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी मोठे वक्तव्य केले असून अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील पैसे मोजण्याचे काम करत होते. होय, हाय मी वंजारी,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
यावेळी बोलत असतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले की,‘धारावीत माझ्या वडिलांनी काही काळ हमाली केली. त्याची त्यांनी कधीच लाज बाळगली नाही. शेती नव्हती म्हणून माझे वडील मुंबईत आले. २२ वर्ष व्हिटी स्टेशनला झोपले. माझी आई लॅमिंग्टन रोडला भाजी विकायची. त्यांनी दोघांनीही खूप कष्ट केले. अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील पैसे मोजण्याचे काम करत होते. होय, हाय मी वंजारी’, असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘ मी ज्ञानात आणि भाषेत कमी नाही. मी जसा आहे तशीच धमक तुमच्यातही असली पाहिजे. तुमची सर्वांना धडकी भरली पाहिजे’. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad pawar) यांच्यामुळेच माझे नशिब फळफळले’, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- IPL AUCTION 2022: अरे ‘बावा’! अंडर १९चा स्टार पंजाबमध्ये गेला कोटीत
- उत्पल पर्रीकरांनी अपक्ष निवडणूक लढवल्याबद्दल फडणवीसांनी व्यक्त केली खंत; म्हणाले…
- पंजाब निवडणूक प्रचार दौऱ्यात प्रियांका गांधींची आम आदमी पक्षावर सडकून टीका, म्हणाल्या…
- IPL Auction 2022 : स्पर्धेत खेळणार नसला तरी, ‘हा’ खेळाडू गेला कोटींच्या घरात
- काँग्रेसला पर्रीकरांवर बोलण्याचा अधिकार आहे का?- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

