मुंबई : जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) गेल्या १२ दिवसांपासून रुग्णालयात आहेत. कोविड १९ पॉझिटिव्ह आणि न्यूमोनिया या दोन्ही आजारांमुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत (Health Update) हळूहळू सुधारणा होत आहे, असून चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे.
दरम्यान लता मंगेशकर यांची मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील (Breach Candy Hospital, Mumbai) डॉक्टरांची टीम काळजी घेत आहे आणि त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले आहे , जिथे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांची काळजी घेतली जात आहे.
#UPDATE | Lata Ji is still in ICU, we are trying our best to ensure she recovers soon. Pray for her recovery: Dr Pratit Samdani, who's treating singer Lata Mangeshkar at Mumbai's Breach Candy Hospital https://t.co/0XqH2nZT22
— ANI (@ANI) January 19, 2022
तसेच लता दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रता समदानी (doctor Pratta Samdani) यांनी सांगितले की, लताजी अजूनही आयसीयूमध्ये आहेत. लताजींच्या प्रकृतीसाठी त्यांनी लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ९२ वर्षीय गायिका यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 9 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्या लवकर बऱ्या होऊन घरी परतण्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
- “आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
- आम्हाला घरात बसायला लावणारे पंतप्रधान लॉकडाऊनमध्ये पार्टी करतात; चिमुरडीची तक्रार
- “शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी निती आमच्याच…”, योगेश कदमांचा गंभीर आरोप
- सोमवारपासून शाळा उघडणार? आज मंत्रीमंडळात निर्णयाची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

