मुंबई: आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी केली होती, यावरच प्रतिक्रिया संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिली आहे.
नटसम्राट हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव आहे आणि गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा असल्याचं त्यांना माहिती नाही. महाराष्ट्रातील सगळे नटसम्राट गोव्यातूनच गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. त्यामुळे नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्यातील जनतेचा, रसिकजनांचा आणि नाट्यकर्मींचा अपमान करत आहेत. त्यामुळे नाटकात कोणी घर देता का घर असं एक वाक्य आहे. तशीच फडणवीसांची मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी अवस्था आहे. अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे.
दरम्यान गोव्यातील आजची परिस्थिती त्रिशंकू विधानसभेकडे चालली आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही आमच्या काही जागा जिंकून आणू. आम्ही जर काही जागा जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचं स्थान असेल. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.तसेच त्यांनी नगरपंचायत निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा क्रमांक एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजपा पहिल्या क्रमांकावर असून नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचं स्थान कायम ठेवल्याबद्दल अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढच राहा अशा मी शुभेच्छा देतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बेरीजच करावी लागेल आणि ही बेरीज बरीच पुढे आहे, असे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
- “आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
- आम्हाला घरात बसायला लावणारे पंतप्रधान लॉकडाऊनमध्ये पार्टी करतात; चिमुरडीची तक्रार
- “शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी निती आमच्याच…”, योगेश कदमांचा गंभीर आरोप
- सोमवारपासून शाळा उघडणार? आज मंत्रीमंडळात निर्णयाची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

