Share

Uday Samant | नाना पटोलेंसमोर रिफायनरी विरोधकांकडून उदय सामंतांना जाळून टाकण्याची धमकी

Published On: 

कोकण :  महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण गढूळ होत चाललं आहे. दादरमध्ये शिवसेना पक्ष आणि शिंदे गटामध्ये राडा झाला आहे.  तर अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. उदय सामंत यांना रिफायनरी विरोधकांनी धमकी दिली आहे.

उदय सामंत यांना कोणी दिली धमकी?

रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकणात होणाऱ्या रिफायनरीला विरोध करताना नरेंद्र जोशी बोलतं होते.

ते म्हणाले की, रिफायनरीला विरोध केला म्हणून आम्ही मुंबईला असताना गावी आमच्या माता भगिनींवर अनेक गुन्हे दाखल केले जातात. कोणत्या आधारावर गुन्हे दाखल करता? थोडंतरी लॉजिक लावा. कोणता तरी मंत्री सांगतोय म्हणून गुन्हे दाखल केले जातात. त्या उदय सामंतला तर आम्ही जाळून टाकू.

पुढे नरेंद्र जोशी असंही म्हणाले की, आमचं गाव, आमची जागा, आमचं भविष्य आम्ही उद्धवस्त होऊ देणार नाही. आम्हाला आमची पवित्र पंचकृषी पाहिजे, आमच्या पंचकृषीत कुणी पाय ठेवला तर त्याचा पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या आंदोलनाची पहिली गोळी हा नरेंद्र जोशी स्वत:च्या अंगावर घेईल, पण हा प्रकल्प होऊ देणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!