मुंबई : वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरातला गेल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच चापलं आहे. हा प्रकल्प हातातून कसा गेला?, यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची खेळी खेळत आहेत. महाविकास आघाडीमधील नेते या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला दोषी मानत आहे. यावरूनच भाजप नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर हल्ला आहे.
काय म्हणाले उदय सामंत ?
महाराष्ट्रात काही गोष्टी ठरवून बोलल्या जात आहेत. स्वत:च्या कर्माचे दुसऱ्यावर खापर फोडायची प्रवृत्ती राज्यात सुरु आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. उदय सामंत यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर सुरू असलेली ही प्रवृत्ती फार चुकीची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच समांत यांनी सांगितलं की, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येण्याची सुरुवात ही जानेवारीमध्ये झाली. त्यानंतर 7 महिने महाराष्ट्र सरकारकडे होते. त्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह पॅकेज द्यायचे होते. इन्सेंटिव्ह पॅकेज हे हायपॉवर कमिटी झाल्याशिवाय आपल्याला फायनल करता येत नाही. ही हायपॉवर कमिटी 15 जुलैला झाली. 38 हजार 831 कोटीचं पॅकेज कमिटीने मंजूर केलं. त्यामुळे हा प्रकल्प कोणामुळे गेला असा आरोप मला कोणावरही करायचा नाही.
पुढे सामंत म्हणाले की, परंतू माझा राजीनामा मागणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे. 7 महिने हायपॉवर कमिटी का झाली नाही?, याचं उत्तर देखील त्यांनी मागावं. त्याचबरोबर रिफायनरीला कोण विरोध करत आहे, हेही जनतेला कळालं पाहीजे.
महत्वाच्या बातम्या :
- Nude Photoshoot प्रकरणी रणवीर सिंगचा जबाब! म्हणाला, “फोटोसोबत छेडछाड…”
- Ajit Pawar | “दुसऱ्या प्रकल्पाचं राज्यातील जनतेला गाजर दाखवू नका”
- Narendra Modi | “त्या कंपनीला महाराष्ट्रातील सत्तांतराची कल्पना कशी असेल”, नरेंद्र मेदींचा एकनाथ शिंदेंना दिलासा
- UPSC Recruitment 2022 : UPSC ची उपसंचालकांसह अनेक पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध! जाणून घ्या…
- Hair Fall Reason | तणावामुळे केस गळतात का? कितपत खरे आहे ते? जाणून घेऊया!


