Share

Chandrashekhar Bawankule | “एक दिवस त्यांच्या व्यासपीठावर केवळ चारच लोकं तुम्हाला दिसतील, पाचवी व्यक्ती दिसणार नाही”

Published On: 

मुंबई : राज्यातील सध्याच राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगी असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

एक दिवस त्यांच्या व्यासपीठावर केवळ चारच लोकं तुम्हाला दिसतील, पाचवी व्यक्ती दिसणार नाही. ही वेळ एकेदिवशी नक्कीच येणार, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी संवाद सधाला, त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी काही लोकांनाच जवळ केल्याने त्यांना 40 आमदार आणि 12 खासदार सोडून गेले आहेत. ‘आपलं कुटुंब आपली जबाबदारी’ एवढाच त्यांचा हेतू आहे, म्हणूनच उद्धव ठाकरेंसोबत आता कोणताही कार्यकर्ता उभं राहायला तयार नाही.

पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, कार्यकर्त्यांना संधी द्यायची वेळ आली तेव्हा मुलगा उभा झाला. कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा स्वतःच मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आताही मुंबईत कोणत्याही बॅनरवर फक्त चारच फोटो दिसत आहेत. पाचवा फोटोच दिसत नाही.

तसेच, कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री व्हावा, हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना मनोहर जोशी, नारायण राणे यासारख्या नेत्यांना मुख्यमंत्री केलं. पण उद्धव ठाकरेंच्या हाती पक्ष येताच ते स्वतः मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसेनची अशी अवस्था झाली असल्याचं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!