Share

Aditya Thackeray | वेदांता-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकरावर हल्ला

Published On: 

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल असल्याचं पाहायला मिळालं. यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप करण्याची जशी चढाओढ लागली असल्याचं दिसून येतं होतं. अशातच आणखिन एक प्रकल्प राज्यातून गेला असल्याचं म्हणत, शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

महाराष्ट्रात येणारा मेडिसीन डिव्हाइस पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची कल्पना सत्ताधारी पक्षाला आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

त्यामध्ये ते पुढे म्हटलं, वेदांता-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिव्हाइस पार्क योजनेलाही मुकावं लागलं आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे.

दरम्यान, वेदांता-फॉस्ककॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 24 सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होतो. त्यावेळेही ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!