मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेत्यानी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. अनेकवेळा हे सरकार पडणार असं भाकीतही भाजप नेत्यांनी अनेकवेळा केलं आहे. आता पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत कॉंग्रेस आणि शिवसेनेला डिवचलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले होते, मालेगावमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचे सगळे नगरसेवक महापौर यांच्यासह राष्ट्रवादीत घेतले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डरकाळी फोडून देखील खेडमध्ये राष्ट्रवादीचा (NCP) पंचायत समिती सभापती झाला. अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने काँग्रेसचे (Congress) आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जात आहेत, राष्ट्रवादीच्याच नेत्यांना कशी पदे दिली जातात, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे फूस लावण्यात प्रसिद्ध आहेत आणि याचा प्रत्यय आता शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला येत आहे, असं देखील पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या व्यक्तव्यानंतर आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यावर प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. उदय सामंत म्हणाले, तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. या आघाडीत बिघाडी करण्याचा पाटलांचा विचार आहे. पुढच्या पावणे तीन वर्षापर्यंत त्यांना हे शक्य होईल का यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. आम्ही या सर्व प्रकाराकडे सकारात्मक बघतो. महाविकास आघाडी भक्कम आहे. आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत म्हणून चंद्रकांत पाटील अशी विधाने करत आहेत, असंही सामंत यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
देशातील टॅक्सपेयर लोकांचा पैसा मोदी सरकारने पेगासस सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरला- जितेंद्र आव्हाड
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी उदय सामंत यांचा पुढाकार; म्हणाले…
तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अॅमेझॉनची मदत घेणार- वर्षा गायकवाड
पेगासस प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये…’
बापरे! विजयानंतर खेळाडूचे रक्तरंजित सेलिब्रेशन ; व्हिडीओ होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

