Share

Raosaheb Danve : “राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून…”, रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर मोठे भाष्य केले आहे. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून मी काही दिवसच विरोधी पक्षात राहणार असल्याचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी म्हटले आहे.

जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केले. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या सहाव्या दिवशी एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आज (रविवार) शरद पवार यांच्यासोबत झालेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत शिंदे गटाचे २० आमदार सतत संपर्कात असल्याचा दावा शिवसेना समर्थकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनीदेखील मोठा खुलासा केला आहे.

आदित्य ठाकरे ज मुंबईतील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले कि, “20 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी बंड केला. ऑफर दिली असता एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!