Share

U19WC: ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत भारताचा फायनलमध्ये प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अँटिग्वा येथे झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय अंडर १९ संघाने ऑस्ट्रेलियाला ९६ धावांनी पराभूत करत सलग चौथ्यांदा फायनल मध्ये प्रवेश केला आहे. भारताला विजय निश्चित करताना कर्णधार यश धुलने शतकीय खेळी केली. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा तिसरा भारतीय कर्णधार तो ठरला.

नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. ज्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया पुढे २९० धावांचे लक्ष ठेवले. दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ १९४ धावांवरच सर्वबाद झाला. भारताच्या विकी ओस्तवाल या गोलंदाजाने तीन विकेट्स घेतल्या. उपकर्णधार शेख रशीदने हि ९४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली आहे. तर कर्णधार यश धुलने धुव्वादार फटकेबाजी करत ११० धाव केल्या. यशच्या आधी विराट कोहली (२००८) आणि उन्मुक्त चंद (२०१२) यांनी शतक केले होते.

भारतीय संघासाठी हा अंडर १९ वर्ल्डकपचा मार्ग सुरुवातीपासून समस्यांनी भरलेला होता. स्पर्धेच्या सुरुवातीलाच कर्णधार यश धूलला कोरोनाची लागण झाली होती. तिथून भारतीय संघाने परिस्थिती सांभाळत आणि चांगली कामगिरी करत फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताने याआधी आठवेळा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे यंदाही भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारताचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध ५ फेब्रुवारी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!