🕒 1 min read
मुंबई: मराठी चित्रटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या 93व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तीन दिवांपूर्वीच 30 जानेवारीला त्यांनी वयाची 93 वर्षे पूर्ण केली होती. त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी त्यांच्या निधनासंबधी महिती दिली आहे.
रमेश देव यांनी आपल्या कारकिर्दीत 285 हून अधिक हिंदी चित्रपटात, 190 मराठी चित्रपट आणि 30 मराठी नाटकांमध्ये 200 हून अधिक प्रयोगात काम केले आहे. त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि 250 हून अधिक जाहिरातींची निर्मिती केली आहे. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या आहेत. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
1951 च्या ‘पाटलाची पोर’ या मराठी चित्रपटात कॅमिओच्या रूपात त्यांचे पदार्पण झाले. राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मागतो एक डोला (1956) या मराठी चित्रपटातून रमेश देव यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याची सुरुवात खलनायक म्हणून झाली. राजश्री प्रॉडक्शनचा आरती (1962) हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.
महत्वाच्या बातम्या:
- ‘गल्ली ते दिल्ली पळाला, अखेर ‘बोक्या’ शरण आला’; मनीषा कायंदे यांची नितेश राणेंवर टीका
- ‘मोदींनी दोन भारत तयार केले एक श्रीमंतांचा आणि दूसरा…’; राहुल गांधींची टीका
- पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो रे चा नारा ??
- “इंदापुरात दडपशाही…”; अंकिता पाटील-ठाकरेंचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंवर हल्ला
- “माझ्या अफेअरची चर्चा व्हायची तेव्हा…”; करिना कपूरने उलगडले गुपित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
