मुंबई: राज्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यात राजकीय नेत्यांनही कोरोनाने गाठले असल्याचे दिसून येत आहे. आता काँग्रेस नेते अमित देशमुख यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची (Congress Leader Amit Deshmukh Corona Positive) माहिती त्यांनी फेसबुकद्वारे दिली आहे.
“माझी आज कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यावर वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार उपचार केले जात आहेत त्यासाठी मी माझ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहे.”, अशी पोस्ट अमित देशमुख यांनी केली आहे.
https://www.facebook.com/100044404720218/posts/494352135388273/
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनाही कोरोनाने गाठले होते. मात्र आता ते कोरोनामुक्त झाले आहेत. सोबतच गाणसम्राज्ञी लता मंगेशकरही (Singer Lata Mangeshkar) कोरोनामुक्त झाल्या आहेत. मात्र अजूनही राजकीय नेते तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोना गाठत असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे आणि…”, केंद्रीय अर्थसंकल्पाहून संजय राऊतांची टीका
- परमबीर सिंहांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह…”
- “…तर मानसिक संतुलन बिघडतं”, नवाब मलिकांच्या टीकेवर मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर
- ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
- ‘गल्ली ते दिल्ली पळाला, अखेर ‘बोक्या’ शरण आला’; मनीषा कायंदे यांची नितेश राणेंवर टीका


