🕒 1 min read
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख(former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अजून एक मोठा खुलासा केला आहे. (Shocking revelation of Parambir Singh) वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी ईडीच्या जबाबात केला आहे.
सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे(Environment Minister Aditya Thackeray) यांनी दबाव टाकला असल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस खात्यात परतण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचेही परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.
तसेच मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या याद्या गृह मंत्रालयातून येत होत्या. आणि या याद्या अनिल देशमुख यांच्यासह मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा आरोपही परमबीर सिंह यांनी केला आहे. दरम्यान आता अनिल परब, मुख्यमंत्री ठाकरे तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची नावे घेऊन परमबीर सीन ह यांनी या प्रकरणाला नवे वळण दिल्याचे दिसून येते. तर यावरच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अशी माहिती प्रसारित करणे हा केंद्रीय यंत्रणांच्या दबावतंत्राचा भाग असून अनिल देशमुख यांच्या जामिनावर सुनावणी सुरू होणार असल्याने त्या आधी वातावरणनिर्मिती करण्यासाठीचे हे डावपेच असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
- ‘गल्ली ते दिल्ली पळाला, अखेर ‘बोक्या’ शरण आला’; मनीषा कायंदे यांची नितेश राणेंवर टीका
- ‘मोदींनी दोन भारत तयार केले एक श्रीमंतांचा आणि दूसरा…’; राहुल गांधींची टीका
- पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो रे चा नारा ??
- “इंदापुरात दडपशाही…”; अंकिता पाटील-ठाकरेंचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
