Share

आरोपींना फाशी द्या, कब्रस्तान देणार नाही: मुस्लिम समाज

Published On: 

मंदसौर : मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये चिमुकलीवर झालेल्या पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उठली आहे. मुस्लिम समाजानेही आक्रमक पवित्रा घेत, आरोपींना फाशीची मागणी केली आहे. तसंच त्यांच्या मृतदेहांना दफन करण्यासाठी कब्रस्तानामध्ये जागा देणार नाही, अशी घोषणाही देखील मुस्लिम समाजाने केली.

मंदसौरमध्ये राहणारी आठ वर्षांची मुलगी मंगळवारी शाळेत गेली होती. ती दुसरी इयत्तेत शिकते. मंगळवारी संध्याकाळी तिचे आजोबा तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता १५ मिनिटांपूर्वीच ती शाळेतून निघून गेल्याचे समजले. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा शोध सुरु केला.

बुधवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मण गेटजवळील झाडाझुडपात पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिच्या बाजूला बीयरच्या बॉटलचे तुकडे होते. तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदौरमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी इरफान उर्फ भय्यू याला अटक केली आहे. इरफानने नातेवाईक आजारी असल्याचे सांगत पीडित मुलीला स्वत:सोबत नेले. त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली असून, या घटनेने मंदसौरमध्ये सर्वत्र संतप्त व्यक्त होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!