🕒 1 min read
औरंंगाबाद : चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन जणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी गजाआड केले.
राजु नाजुकराव इंगळे (वय २४), योगेश शंकर गुजरकर (वय २४, दोघे रा. सावरा, ता. आकोट, जि. अकोला ह.मु. कमळापूर, रांजनगाव-शेणपुंजी) अशी दुचाकी चोरट्यांची नावे असून त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी दोन जण २३ पेâब्रुवारी रोजी नारेगाव येथील पाण्याच्या बंब्याजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक अमरनाथ नागरे, पोलिस अमंलदार मुनीर पठाण, अविनाश दाभाडे, गणेश जाधव, विक्रांत पवार यांनी सापळा रचून राजु इंगळे व योगेश गुजरकर यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दोघांनी सदरील दुचाकी लोकसेवा हॉटेल समोरून चोरली असल्याची कबूली दिली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नथुराम गोडसेच्या कट्टर समर्थकाचा कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
- नितीन गडकरी म्हणाले, ‘या’ गोष्टीची होणार ‘लिम्का बुक’मध्ये होणार नोंद
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री खरच नाराज आहेत की त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ?
- खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे; रुपाली ठोंबरे यांची विखारी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
