Share

संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री खरच नाराज आहेत की त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. संजय राठोड येनचे या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

विरोधकांना चांगलीच सरकारला खिंडीत पकडण्यासाठी संधी मिळाली असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे.यातच संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले.यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.

नुकतेच राठोड चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी राठोड याना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागले होते अश्या बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या.उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्यावर नाराज असून राठोड यांच्याशी अवघी दोन मिनिटं जुजबी चर्चा करुन काढता पाय घेतला असल्याचे वृत्त देखील माध्यमांनी मोठ्या चवीने चघळले.

महाराष्ट्राची मान शरमेने झुकवणाऱ्या या सर्व प्रकारामुळे संजय राठोड यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, एका बाजूला या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र पूजाच्या मृत्यूला एवढे दिवस उलटून गेल्यावर देखील कोणतीही कारवाई झाली नसल्याने खरंच उद्धव ठाकरे या प्रकरणाबाबत गंभीर आहेत का आता असाच नाविलाजाने सवाल उपस्थित करावा लागत आहे.

गंभीर आरोप असलेल्या मस्तवाल संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना एवढा वेळ का लागावा ?पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अठरा दिवस झाले. अजूनही मुख्यमंत्री अजूनही चर्चा करण्यातच का गुंतले आहेत? उद्धव ठाकरे खरच नाराज आहेत कि त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ? राठोड सारख्या उद्दाम माणसावर कारवाई करण्यासाठी एवढा वेळ का लागावा ? उद्धव ठाकरे हे हतबल झाले आहेत का असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!