औरंगाबाद : खाम नदी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून हे वृक्ष शहराला शुद्ध हवा देतील,असे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी वृक्षारोपण प्रसंगी सांगितले. यावेळी बोलताना मनपा प्रशासक पाण्डेय म्हणाले की, खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत स्वच्छता व सौंदर्यकरणाचे काम महानगरपालिकेने स्मार्ट सिटी, व्हॅरॅक कंपनी, छावणी परिषद, एएससीडीसीएल,सीआयआय, इको सत्व, स्वयंसेवी संस्था व नागरीक यांच्या सहकाऱ्याने हाती घेतला आहे.
खाम नदीच्या काठावर आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून नदीच्या सौंदर्यात भर पडणार आहे, एवढेच नव्हे तर शहराला भरपूर शुद्ध हवा मिळणार आहे. आज आपण कोरोनाच्या काळात कोरोनाशी लढा देत असताना ऑक्सिजन किती महत्वाचा आहे, हे समजले आहे. हे वृक्ष शहराला म्हणजेच नागरिकांना ऑक्सिजन देणार आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षरोपण करून वृक्षांचे संगोपन करावे ,अशी आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
लहान मुलांना वृक्षाचे महत्व कळावे म्हणून खाम नदी येथे अमरेंद्र भोंबे या बालकाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मनपा आयुक्तांच्या पुढाकारातून खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. या परिसरातील वृक्ष लागवड आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. खाम नदीला पुर्नवैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महागाईचा भडका ; कॉंग्रेसने केले PPE किट घालून भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन
- कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून वकीलासह बेरोजगारांना गंडविणाऱ्यास न्यायालयीन कोठडी
- ट्विटरवर केंद्राचा दबदबा ; इशारा देताच मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्ल्यू टीक परतले
- ‘तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल’ ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
- उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

