मुंबई : पेट्रोल व डिझेल यांच्या किंमतीमध्ये रोज थोडी थोडी वाढ करून आता पेट्रोलने १०० रूपयांचा टप्पा ओंलडला आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीयांच्या हाल अपेष्ठामध्ये भर घातली असून मोदी सरकार मात्र निष्क्रीय व झोपी गेलेली आहे. जनतेचा आक्रोश त्यांना ऐकू येत नाही. या कोरोना काळात आता डिझेल व पेट्रोलचे दर तातडीने कमी करावेत व त्यासाठी डिझेल, पेट्रोलवरील केंद्रसरकारचा अबकारी कर (एक्साईज ड्युटी) मोठ्या प्रमाणात कमी करावी अशा मागण्यासाठी आता कॉंग्रेसनेआज मुंबईत रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क पीपीई किट घालून त्यांनी नरिमन पॉइंट भागातल्या भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार होतं. पण त्याअगोदरच पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरलं. PPE किट घालून केलेलं हे आंदोलन त्यामुळे लक्षवेधी ठरलं. मुंबईतल्या युथ काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं पोलिसांना कळताच नरिमन पॉइंट भागातला बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला होता. कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून घोषणाबाजी केली. या आंदोलनाचा आमदार झिशान सिद्दीकीच्या नेतृत्वात आज पेट्रोलच्या चढ्या किमतीविरोधात युथ काँग्रेसने आंदोलन केले. भाजपच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं जाणार होतं. पण त्याआधीच मुंबई पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व आंदोलन करू दिले नाही.
महत्वाच्या बातम्या
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून वकीलासह बेरोजगारांना गंडविणाऱ्यास न्यायालयीन कोठडी
- ट्विटरवर केंद्राचा दबदबा ; इशारा देताच मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्ल्यू टीक परतले
- ‘तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल’ ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
- उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

