औरंंगाबाद : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लोन अधिकारी असल्याचे भासवून बेरोजगार युवकांना नोकरी लावण्याचे तसेच कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून ७४ लाख ५० हजार रूपयांचा गंडा घातला होता.
या प्रकरणी अटकेत असलेल्या शैलेश बाबुराव कांबळे (वय ४८, रा. सिध्दीविनायक अपार्टमेंन्ट, गादीया विहार परिसर) याची न्यायालयीन कोठडीत रवागनी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी शुक्रवारी (दि.४) दिले.
उस्मानपुरा परिसरातील पन्नालालनगर येथील रहिवासी अ;ॅड. देवकांत बलवंतराव मेश्राम (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शैलेश कांबळे यांच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यावर छावणी पोलिसांनी शैलेश कांबळे याला ३० मे रोजी अटक केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’


