औरंंगाबाद : समृध्दी महामार्गाच्या कामासाठी आलेले दोन लाख पाच हजार ५२१ रुपयांचे सिमेंट लंपास करणाऱ्या मेघा इंजिनीरींग कंपनीच्या सुपरवायझर बिक्रमदेव बिपीनचंद्र सामंत (वय ३८, रा. माझीगाव, कोनीसी जि. गंजम उडिसा ह.मु. पळशी ता.जि. औरंगाबाद) व गणेश अंबादास खेडकर (३२, रा. खोपटी ता. शिरुर कासार बीड) या दोघांना चिकलठाणा पोलिसांनी गजाआड केले.
मेघा इंजिनीरींग कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर चिडी शंकरराव विश्वनाथन (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिडी यांची कंपनी मुंबई नागपुर समृध्दी महामार्गाचे काम करित आहे. त्यांचा पळशी येथे सिमेंट कॉंक्रीटचा प्लांट आहे. १५ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास स्टोअर मॅनेजर बबला रमेश याने चिडी यांना सांगितले की, सिमेंट घेवून एक वाहन क्रमांक (एमएच-१२-एमव्ही-१५२६) आले होते.
त्या वाहनाच्या चालकाने वजन केले मात्र सिमेंट न उतरवताच परत गेले. ही बाब माहिती होताच चिडी यांनी चौकशी केली असता सुपरवायझर ब्रिकमदेव सामंत याने वाहन चालक गणेश खेडकर याच्या साथीने दोन लाख पाच हजार ५२१ रुपये किंमतीचे सिमेंट लंपास केल्याचे समोर आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- कृषी उत्पन्न बाजार समितीनिहाय आठ दिवसात अहवाल द्या, राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे कडक निर्देश
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
- नंदुरबार अपघात; पंतप्रधान मोदींकडून मराठीत ट्विट करत मदत जाहीर
- नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

