🕒 1 min read
परभणी : मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, याबाबत तातडीने पंचनामे करुन लवकर प्रस्ताव सादर करावेत. तसेच परभणी जिल्ह्यातील मार्केट कमीट्यांची सविस्तर माहिती जाणून घेवून सरासरी उलाढाल व नाविण्यपूर्ण उपक्रमांची विचारणा करत सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचा स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीनिहाय अहवाल ८ दिवसात तातडीने सादर करावा. अशा कडक सुचना राज्यमंत्री शुभुराज देसाई यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन आदि विभागांची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, पोलिस अधिक्षक जयंत मीना आदीची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून कोविडजन्य परिस्थितीच्या आव्हानात्मक काळात राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अतुलनिय योगदान दिले जात आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबध्द असून येणाऱ्या काळात कौशल्य विकासाच्या विविध योजनतेतील ११ सेक्टरमध्ये प्रशिक्षण देत असून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावर भर दिला आहे. पुणे जिल्ह्यातील औंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर आयटीआयची पुर्नउभारणी करावी व कौशल्य विकास गाव-खेड्यापर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे निर्देश देसाई यांनी दिले.
पुढे बोलतांना राज्यमंत्री देसाई म्हणाले की, जिल्ह्यातील विविध विभागांनी कोविडजन्य परिस्थितीचा विचार करता उत्तम काम करुन उद्दीष्ट पूर्ण केले आहे असे सांगून उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षणाचे दोन शिफ्टमध्ये प्रशिक्षण देवून यासाठी राखीव असणारा निधी वेळेत खर्च करावा अशी सुचना त्यांनी संबंधितांना केली.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
- नंदुरबार अपघात; पंतप्रधान मोदींकडून मराठीत ट्विट करत मदत जाहीर
- नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी
- ‘दलित, ओबीसी, शेतकऱ्यांची मुले मंत्री बनले म्हणून काही लोकांना पोटशूळ’; विरोधकांच्या गोंधळावर मोदींच भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
