Share

परराज्यातून कारमध्ये गांजाची वाहतूक करणारे दोघे गुन्हेशाखेच्या जाळ्यात, ३७ किलो गांजासह १२ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : परराज्यातून कारमध्ये शहरात गांजा आणून विक्री करणाऱ्या दोन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी रविवारी (दि.६) पहाटे सापळा रचून गजाआड केले. तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी ३७ किलो ३०० ग्रॅम गांजासह १२ लाख ४६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी कळवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत लक्ष्मण बनसोडे (वय ३१), जगन्नाथ श्रीमंत लाटे (वय ३६) दोघे रा.चौधरी कॉलनी, चिकलठाणा अशी गुन्हेशाखेच्या ताब्यात असलेल्या गांजाची तस्करी करणा-यांची नावे आहेत. तर भिकन कडूबा रिठे (रा.चिकलठाणा बाजारतळ) व सनी अशी अंधाराचा फायदा घेवून पसार झालेल्यांची नावे आहेत. इनोव्हा कार क्रमांक (एमएच-२०-एए-४४१३) मधुन आंध्रप्रदेशातील दाराकोंडा येथून चार जण गांजा घेवून शहरात येत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलिस अंमलदार ओमप्रकाश बनकर, विरेश बने, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, बबन ईप्पर, दादासाहेब झारगड आदींच्या पथकाने केंब्रीज चौकात सापळा लावला होता.

पोलिसांनी श्रीकांत बनसोडे व जगन्नाथ लाटे या दोघांना ताब्यात घेत कारची झडती घेतली असता १ लाख ८६ हजार ५०० रूपये किंमतीचा ३७ किलो ३०० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी इनोव्हा कार, गांजा, एक मोबाईल असा एकूण १२ लाख ४६ हजार ५०० रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!